सिंह आणि उंदीर
एकदा सिंह झोपलेला असताना उंदराने त्याच्यावरून धाव घेतली. सिंहाने उंदराला पकडले पण उंदराने माफी मागितली. सिंहाने त्याला सोडून दिले. काही दिवसांनी सिंह जाळ्यात अडकला. उंदराने जाळे कुरतडून सिंहाला सोडवले.बोध: लहानाची मदत मोठ्यालाही उपयोगी पडते.